अष्टगंधारचा तिसरा भाग लता मंगेशकर यांच्यावर
सोमवारी दीपलक्ष्मी सभागृहात कार्यक्रम
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग तिसरा हा दि. सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉल मधे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम स्व. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित आहे. रॉयल म्युझिकल इव्हेंट्सच्या पूनम धुमाळ ह्या कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुजाता नावंधर, श्री. राजू नावंधर, श्री. सुरेश लवंगारे, व दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे श्री. प्रमोद लोंढे यांची आहे निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. पुनम धुमाळ यांचे सोबत रॉयल चे इतर गायक त्यांना साथ संगत देणार आहेत.
तरी ह्या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मी चे चेअरमन श्री. शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.

