साताऱ्यात गुरुवारी मस्ती भरा है समा कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर्स क्लबतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुहाना सफर सिंगर क्लब सातारा यांच्या वतीने मस्ती भरा हे समा ही हिंदी गीतांची सुश्राव्य मैफल गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे आहे सूत्रसंचालन दिपाली गीते करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे सांभाळणार आहेत या मैफिलीमध्ये विजय साबळे, शिरीष खुटाळे, डॉक्टर सुनील पटवर्धन, डॉ. हेमंत मांडवे डॉक्टर सुहास पाटील, चंद्रशेखर बोकील, सचिन शेरकर, मिलिंद हर्षे, शिवकुमार, सलाम अली, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे, स्मिता शेरकर, कविता शिवकुमार, रेवती बंड, ममता नरहरी, दिपाली घाडगे, श्रुती बेंद्रे, स्मिता कोरपे, कलाचंद, मीनाक्षी मांडवे हे कलाकार गाणी सदर करणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!