सुभाषराव गुरव यांनी वंचितांच्या व्यथा वेदना मांडल्या
ठिणग्या या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन दीपलक्ष्मी हॉलमध्ये प्रकाशन
सातारा
सुभाषराव गुरव यांनी वंचितांच्या व्यथा वेदना आपल्या शब्द सामर्थ्याच्या जोरावर,उत्तम कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडलेल्या आहेत असे गौरवोद्गार
इस्लामपूर, येथील जेष्ठ साहित्यिक,लेखक,कवी प्रा.प्रदिप पाटील (जेष्ठ साहित्यिक,लेखक,कवी) यांनी काढले.
आम्ही पुस्तकप्रेमी समुह व दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने परिस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या लेखक सुभाषराव गुरव यांच्या ठिणग्या या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन दीपलक्ष्मी हॉल येथे झाले तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.त्यांनी या कथासंग्रहाचे महत्व विशद केले
प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने म्हणाले,या पुस्तकातील नायक नायिका हे आज ठिणग्या आहेत परंतु ते उद्या वणवा पेटवल्याशिवाय रहाणार नाहीत सकारात्मक अर्थाने इतकी उर्जा त्यांच्यात ठासून भरलेली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म.सा.प. पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी ,साहित्यिक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक.डॉ.संदीप श्रोत्री,साहित्यिक,पटकथा संवाद लेखक,व्याख्याते निलेश महिगांवकर ,कार्यवाह म. सा. प. शिरीषजी चिटणीस उपस्थित होते
सर्वच प्रमुख पाहुण्यांनी सुभाषराव गुरव यांच्या ठिणग्या कथासंग्रहाच्या लिखाणाविषयी तसेच गुरव यांचे विषयी गौरवोद्गार काढले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

