शपथविधीला 7000 लोकांची उपस्थिती
अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रण
नवी दिल्ली
एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे .या सोहळ्याला विदेशी पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले असून बांगलादेश, भूतान, श्रीलंकेचे पंतप्रधान तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर अनेक राजकीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण 7000 हजार लोकं सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत रविवारी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला छावणीचं रुप आलं आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. ड्रोन उडवण्यावर किंवा पॅराग्लाइडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जूनला दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. राष्ट्रपदी भवनला निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. तसंच एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केलं जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. पण एनडीएने 293 जागा मिळवल्या. भाजपाच्या खात्यात 240 जागा आल्या. तर इंडिया आघाडीला 234 जााग मिळाल्या आहेत. यात काँग्रेसला 99 जागा जिंकता आल्या
