साताऱ्यात गुरुवारी सुरसंगम हिंदी गाण्यांची मैफल
रफी,मुकेश व किशोर कुमार यांची गाणी होणार सादर
सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सुरसंगम कार्यक्रमाच्या 97 व्या भागामध्ये महंमद रफी, किशोर कुमार आणि मुकेश या गायकांची गाजलेली गाणी गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केली जाणार आहेत.युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर लियाकत शेख, मुकुंद फडके, मंजिरी दीक्षित, डॉक्टर सारिका देशपांडे, हेमंत कासार शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार स्वाती शेडगे, मीना गोंदकर, शहाबुद्दीन शेख, नासिर पालकर, राजेश वंजारी, तुषार पाटील, अमोल जाधव फारुख शेख हे विविध गाणी सादर करणार आहेत .कार्यक्रमाचे निवेदन राजेश वंजारी करणार असून ऑडिओ आणि व्हिडिओ यंत्रणा कलाकार स्टुडिओ यांच्यातर्फे सांभाळली जाणार आहे .या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

