रविवारी सुरमयी शाम कार्यक्रम
१९५० ते १९७० च्या दशकातील गाणी होणार सादर
सातारा
दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक रविवार 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या कराओके या कार्यक्रमात 1950 ते 1970 अशा कालखंडातील ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील हिट गिते सादर करण्यात येणार आहे.रविवारी सायंकाळी दीपलक्ष्मी सभागृहात सायंकाळी ५ ३० ते ८ ३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात गीतांजली पाटील, श्वेता जाधव, उर्मिला शर्मा आणि कैलास मोहिते यांची गाणी सादर होणार आहेत. ध्वनी संयोजक कैलास मोहिते करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ऍड सीमंन्तीनी नुलकर, वासंती घाडगे, स्नेहा टाकेकर, लियाकत शेख, कैलास मोहिते, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
तेसर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

