संस्कार भारती तर्फे 2 ऑक्टोबरला कथाकथन स्पर्धा
मिरासदार, माडगूळकर, शंकर पाटील, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
सातारा
संस्कार भारती, सातारा जिल्हा समितीतर्फे शुक्रवार दोन ऑक्टोबर 2026 रोजी कथाकथन स्पर्धा कथाकथी 26 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर आणि सचिव प्रदीप इनामदार यांनी दिली.
मराठी साहित्यात कथाकथन हा साहित्यप्रकार लोकप्रिय करणारे ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार,शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्कार भारतीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या कथाकथन स्पर्धेला सुरुवात होणार असून ही स्पर्धा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे.अठरा वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी ही स्पर्धा खुली असून स्पर्धकांनी द मा मिरासदार ,शंकर पाटील किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्याही कथेचे वैयक्तिक किंवा सामुदायिक सादरीकरण करावयाचे आहे. सामुदायिक पद्धतीने सादरीकरण करत असताना सहभागी सदस्यांची संख्या कमाल 4 असावी. प्रत्येक स्पर्धकाला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे .आपले सादरीकरण करत असताना स्पर्धक वेशभूषा, केशभूषा,रंगभूषा अथवा पार्श्वसंगित याचा वापर करू शकतात. सातारा जिल्हा पातळीवर तीन क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना अंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पुणे येथे 15 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
या कथाकथन स्पर्धेसाठी 500 रुपये प्रवेश फी असून स्पर्धकांचे सादरीकरण झाल्यावर त्यातील 300 रुपये त्यांना त्वरित परत केले जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी
दिलीप चरेगावकर 9921958042
प्रदीप ईनामदर कराड 9403771950
डॉ सुनील देशपांडे वाई 9423865458
मुकुंद फडके 9552593297
संजीव आरेकर 8149912687
रसिका केसकर 9420630374
यांच्याशी 30 सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा.

