ठिणग्या कथासंग्रहाचे शनिवारी प्रकाशन
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्थेचा उपक्रम
सातारा
येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक सुभाषराव गुरव यांच्या ठिणग्या या ग्रामीण कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे
परिस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक व कवी प्रदीप पाटील उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,प्रसिद्ध चित्रपट पटकथा व संवाद लेखक प्रताप गंगावणे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, साहित्यिक व प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर संदीप श्रोत्री, लेखक व्याख्याते व पटकथा संवाद लेखक निलेश महीगावकर आणि परिस प्रकाशनचे गिरीश भांडवलकर उपस्थित राहणार आहेत
या पुस्तक प्रकाशन समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लेखक सुभाषराव गुरव यांनी केले आहे

