कुमार सानू यांच्या गीतांची साताऱ्यात आज मैफिल


सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि गोल्डन एरा म्युझिकल ग्रुप, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेरी आवाज ही पहचान है’ प्रस्तुत हिट सॉंग ऑफ कुमार सानू ही गीतांची मैफिल बुधवारदिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आयोजित केली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राचार्य रमणलाल शहा,राजकुमार निकम,गणेश शिंदे,अनिल वाळिंबे,शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना प्रवीण जांभळे यांची असून निवेदन शामल काकडे करणार आहेत.या मैफिलीमध्ये प्रवीण जांभळे व शामल काकडे तसेच गेस्ट सिंगर सुजाता दरेकर व हालीमा दीदी आपली गीते सादर करणार आहेत.या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्तसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!