यौवनस्पर्श पुस्तकांवर रविवारी परीचर्चा


आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रम

Advertisement

सातारा
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयातर्फे जागतिक आरोग्यदिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर मोहन सुखटणकर यांनी लिहिलेल्या निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श (मुलींसाठी व मुलांसाठी ) या पुस्तकावर परिचर्चा आयोजित करण्यात आली आहे
रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता पाठक हॉल येथे ही परीचर्चा होणार असून त्यामध्ये डॉक्टर अनिमिष चव्हाण, डॉक्टर मेधा क्षीरसागर, डॉक्टर संदीप श्रोत्री,डॉक्टर राजेंद्र माने सहभाग घेणार आहेत
तसेच यावेळी साताऱ्यातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञांचा सत्कारही करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अजित कुबेर,उपाध्यक्ष अतुल जोशी आणि विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!