बुधवारी साताऱ्यात सुरमयी शाम कार्यक्रम
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दीप लक्ष्मी सभागृहामध्ये सुरमयी शाम हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, किशोर कुमार,मोहम्मद रफी,एस पी बाल सुब्रमण्यम यांची गाजलेली गाणी गीतांजली पाटील, कैलास मोहिते ,श्वेता जाधव, उर्मिला शर्मा सादर करणार आहेत
या कार्यक्रमाचे निवेदन श्वेता जाधव करणार असून ध्वनी व्यवस्था कैलास मोहिते यांची असणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संध्या चौगुले, काका पाटील, मुकुंद फडके अनिल वाळिंबे आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
सातारकर रसिकांनी या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे

