वार्षिक राशिभविष्य 2025 : मकर
वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते
मकर
परिवर्तन घडविणारे वर्ष
मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष अनेक बाबतीत परिवर्तन घडविणारे असेल मकर राशीचा राशी स्वामी शनी असून त्यांना सगळे न्यायदेवता म्हणतात शनिदेव प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे शुभ फळ देतात मार्च महिन्यापर्यंत शनीचे गोचर कुंभ राशीतून होणार आहे म्हणजेच मकर राशीची साडेसाती ही मार्च 2025 रोजी समाप्त होत आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळेल धनलाभ होतील कुटुंबातील काही अडचणी संपतील किंवा त्यावर योग्य उपाय मिळेल विद्यार्थी परीक्षेत चांगले यश मिळवतील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेत यश मिळेल तसेच सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षांमध्ये ही त्यांना यश मिळेल व्यावसायिकांमध्ये अनेकांची भागीदारी संपुष्टात येईल किंवा तुटली जाईल परंतु जे व्यावसायिक आपल्या कामात शिस्त आणि प्रामाणिकपणे काम करत असतील त्यांच्या जीवनात कोणताही बदल होणार नाही लव मॅरेज करणाऱ्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून बराच त्रास होईल वर्षाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनात जोडीदाराशी खूप समजूतीने वागावे लागेल मकर राशीच्या शेतकऱ्यांना शेतीत चांगले अन्न उत्पादन होईल त्यामुळे चांगले आर्थिक लाभ होतील मात्र यावर्षी आगीपासून सावध राहा अग्नीपासून काही ना काही नुकसान होण्याची शक्यता आहे 29 मार्च 2025 रोजी शनीचे गोचर कुंभ राशीतून मीन राशि मध्ये होईल या दिवशी मकर राशीची साडेसाती संपेल शनीचा होत असणारा त्रास कमी होईल जीवनात चांगल्या गोष्टी मनासारख्या गोष्टी घडायला लागतील मनातील अनेक इच्छा आकांक्षा यावर्षी पूर्ण होतील काहींना आजारातून मुक्ती मिळेल कुटुंबात समृद्धी येईल अनेक मकर राशीचे तरुण ज्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते ती नोकरी मिळेल खाजगी किंवा सरकारी संस्थांमध्ये अनेकांना नोकरी मिळेल जे लोक राजकारणात आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींकडून आपले काम करून घ्याल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल शिक्षण क्षेत्रातील अनेक अडचणी दूर होतील काहींना परदेशात जाण्यासाठी काही अडचणी येत होत्या त्या दूर होतील काहींना परदेशात नोकरी मिळण्याचे योग येतील 14 मे 2025 रोजी गुरुचे गोचर वृषभ राशीतून मिथुन राशीत होईल गुरु मकर राशि पासून सहाव्या स्थानातून भ्रमण करील सहावे स्थान हे गुरु ग्रहासाठी फारसे चांगले किंवा शुभ नसते मागील वर्षी गुरु तुमच्या पंचमस्थानातून गोचर करत होते ते शुभकारक होते पण 14 मे नंतर काहींना मधुमेह रक्तदाब यासारखे आजार होऊ शकतात काहींना अचानक कर्ज काढावे लागू शकते परंतु गुरुचे गोचर अशुभ असले तरीही गुरु अनेक बाबतीत तुमच्यासाठी सकारात्मक असेल तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जर काही अडचणी असतील तर त्या गुरूच्या दृष्टीमुळे संपतील परदेशात काहींचा व्यवसाय असेल तर त्याची व्याप्ती वाढेल कुटुंबात आनंदी आणि चांगले वातावरण राहील अनेक मार्गाने धनलाभ होतील 30 मे 2025 रोजी राहू आणि केतूचे गोचर कुंभ आणि सिंह राशीतून होईल राहूचे गोचर धनस्थानातून तर केतूचे गोचर अष्टमस्थानातून होईल आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल घरात शांतता ठेवावी लागेल आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या बाहेरचे मसालेदार तेलकट पदार्थ खाऊ नका नाहीतर पोट बिघडू शकते पाइल्स सारखे रोगही होऊ शकतात मकर राशीसाठी जानेवारी मे जून आणि सप्टेंबर हे महिने थोडे आव्हानात्मक राहतील

