महिला दिन विशेष गीत मैफिलीस प्रतिसाद
तू तेव्हा तशी कार्यक्रमात विविध गीते सादर
सातारा
दीपलक्ष्मी पतसंस्था सभागृहांत अभूतपूर्व श्रोत्यांच्या प्रतिसादात,”माय बिट्स स्टुडिओ व दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने,”तू तेव्हा तशी”हा जागतिक महिला दिनानिमित्त खास गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता डॉ लियाकत शेख व त्यांच्या गायक सहकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला शेख सरांनी आणि इतरांनी महिलांच्या विविध रूपावर प्रकाश टाकणारी मराठी,हिंदी गीते सादर केली.यात आई,बहीण ,मैत्रीण, प्रेयसी व महिलांची अनेक रूपे व त्यांच्या भावना समजवून सांगणारी अवीट गोडीची व विविध चाली असणारी गीते सादर करण्यात आली.
कलाकारांमध्ये सौ वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित,ममता नरहरी,कलाचांद,सारिका हेंद्रे तसेच प्रा राजेंद्र कुमार निकम,गणेश शिंदे ,जतीन शिंदे ह्यानी अप्रतीम गाणी सादर केली,तर डॉ लियाकत शेख यांनी मुकेश यांचे गाणे “सजन रे झूट मत बोलो”हे गाणे सादर केले
या कार्यक्रमाचे उदघाटन गायक आणि संगीतकार संजय दीक्षित,सौ सुरेखा शेजवळ,दिलीप चरेगांवकर,अनिल वाळिंबे,शिरीष चिटणीस व लियाकत शेख यांचे हस्ते करण्यात आले.
चित्रा भिसे यांनी अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले तसेच २ गाणीही गायली.लियाकत शेख यांच्या ‘ माय बिट्स स्टुडिओ ‘ चा हा पहिलाच कराओके चा कार्यक्रम होता

