पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन
डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे उपक्रम
सातारा
सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी प्रमाणेच यावर्षी 1 जानेवारी 2026ते 31 डिसेंबर 2026 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ आणि ‘ सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत.
ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा दिली होती. तसेच सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे व ग्रंथालय चळवळीचे ते मार्गदर्शक होते. सातारा येथे भरणाऱ्या जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे ते संस्थापक अध्यक्ष व प्रेरणास्थान होते .ग्रंथ, ग्रंथालय ,ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथपाल यांच्या साठी ज्यांनी आयुष्यभर काम केले त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी सुमन शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गेली पंधरा वर्षे हे पुरस्कार दिले जातात.
महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इच्छुक लेखकांनी सन 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथांच्या दोन प्रती दि. १५ जानेवारी 2027 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवाव्यात.
दोन उत्कृष्ट ग्रंथाना प्रत्येकी 2500/-रोख बक्षीस दिले जाईल.कोणत्याही साहित्य प्रकारातील स्वलिखित अथवा अनुवादित पुस्तके पुरस्कारासाठी पाठवू शकता.
स्वतः लेखक वा प्रकाशकही पुस्तके पाठवू शकतात.दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते सातारा येथे संपन्न होतो .
अधिक माहिती व संपर्कासाठी फोन
1: सुनिता कदम 9822112155
2:डॉ.राजेंद्र माने 8975981321
3: प्रा.प्रमोदिनी मंडपे 8600101063
4: डॉ सौ सुनीता उत्तेकर 9422401704
5. डॉ वैशाली चव्हाण 98239 86280
पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता :
ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय
C/O डॉ अनिमिष शिवाजीराव चव्हाण
मैत्र क्लिनिक
रुक्मिणी कुंज,सावकार रोड,
गुरुवार पेठ,सातारा
Pin…415002

