सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला
पाच जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी
सिडनी
ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोराने अनेक लोकांवर चाकू हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 5 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार वेस्टफिल्डमॉलमध्ये हा हल्ला झाला आहे. पोलिसांनी उत्तरादाखल केल्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आहे. घटनास्थळापासून स्थानिकांनी दूर रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी या भागातून लोकांना बाहेर काढलं आहे. मॉलच्या बाहेर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या व्हॅन्सची गर्दी झाल्याचं दिसतं आहे.
या घटनेत प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यांनी असं सांगितलं आहे की पोलिसांनी अनेक जखमींना वाचवलं आहे. तसंच मॉलमध्ये आम्ही होतो. मॉलच्या जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. आज ही घटना घडली त्यानंतर पोलीस आले, त्यांनी अनेकांना तिथून बाहेर काढलं. हल्लेखोर कोण होता? त्याने हे सगळं का केलं याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलीने तिच्या आई वडिलांना केलेल्या मेसेजमध्ये हे लिहिलं आहे की तिने मॉलमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकला. मी माझा जीव वाचवण्यासाठी एका शोरुममध्ये लपले आहे असं या मुलीने म्हटलं आहे. मॉलमध्ये चाकू हल्ला आणि गोळीबार झाल्यानंतर अनेक लोकांनी दुकानंच शटर लावून आत थांबणंच पसंत केलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की जे लोक जखमी झाले आहेत त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
