मोहम्मद रफी यांच्या गायनकलेला माणुसकीचा स्पर्श
पुण्यतिथीनिमित्त गाण्यांचा विशेष कार्यक्रम सादर
सातारा
भारतीय चित्रपट सृष्टीतील आधुनिक तानसेन अशी ओळख असणारे जेष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गायनकलेला माणुसकीचा स्पर्श होता.म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही मोहम्मद रफी यांची गाणी रसिकांच्या ओठावर आणि हृदयात आहेत असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले. येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही आनंदयात्री ग्रुप यांच्यातर्फे मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम मुझे यु भुला ना पाओगे हा गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
मोहम्मद रफी यांनी आपला गायनाचा व्यवसाय जपतच अनेकांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक मदतही केली होती असे सांगून मुकुंद फडके म्हणाले अनेक, अभिनेत्यांची कारकीर्द केवळ महंमद रफी यांच्या आवाजामुळे घडत गेली.अनेक संगीतकार चित्रपटसृष्टीमध्ये केवळ मोहम्मद रफी यांच्यामुळे यशस्वी होऊ शकले
मोहम्मद रफी यांच्या आवाजाला एक वेगळीच गुणवत्ता होती.म्हणून सर्वच प्रकारची गाणी ते लीलया गाऊ शकले आणि पडद्यावर नायक कोण आहे याचे भान ठेवून त्यांनी गायन केल्याने त्यांच्या आवाजातील अष्टपैलूत्व अनेक वेळा समोर आले असेही मुकुंद फडके म्हणाले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली
यावेळी व्यासपीठावर शिरिष चिटणीस, ममता नरहरी,रमेश वेलणकर, हेमंत कासार, जयमाला शेटे आणि आम्ही आनंदयात्री ग्रुपचे कलाकार उपस्थित होते
आम्ही आनंदी यात्री ग्रुपच्या ऍड लक्ष्मीकांत अघोर,प्रिया अघोर,प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, अनंत जोशी विजय चव्हाण, वैशाली
चंद्रसाली आणि मधु गिजरे या कलाकारांनी मोहम्मद रफी यांनी गायलेले विविध गाणी सादर केली.प्रमुख पाहुणे शिरिष चिटणीस आणि ममता नरहरी यांनीही काही गाणी सादर केली
कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी यांनी केले
या कार्यक्रमाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला

