“अष्टगंधार” गीत मैफिलीत मंगळवारी किशोरकुमार


दीपलक्ष्मी पतसंस्था व रॉयल म्युझिकल इव्हेंट्सची प्रस्तुती
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” ही
आठ गायकांची खास मालिका असून मंगळवारी पहिल्या भागात किशोर कुमार यांनी गायलेलय गाण्यांची मैफिल दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल 759 अ,शनिवार पेठ सातारा .येथे मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते ते 8.30 वाजेपर्यंत आयोजित केली आहे.
या गीत मैफिलिस प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ , सौ सुरेखा शेजवळ,डॉ. कामिनी पाटील , दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक- चेअरमन
शिरीष चिटणीस मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाची संकल्पना प्रमोद लोंढे , यांची असून निवेदन राधिका काळे करणार आहेत .गोपाल काळे आपली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार आहेत .या कार्यक्रमाचे व्यवस्थापन लक्ष्मीकांत तरडे,योगेश आवळे, राजेंद्र साळुंखे,रवी म्हेत्रे करणार आहेत.
पहिल्या किशोर कुमार यांच्या गीत मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच अष्टगंधार ची संकल्पना करणारे प्रमोद लोंढे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!