अभय गरगटे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव, केमिस्ट क्षेत्रात भरीव कामगिरी
सातारा
सातारा जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या अडचणी व समस्यांना धावून जात अनेकांना न्याय मिळवून देणारे सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अभय गरगटे यांचा ५८ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत राधिका पॅलेसमध्ये उत्साहात संपन्न झाला.अभय गरगटे यांनी केमिस्ट क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवत केमिस्ट बांधवांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाविषयी मान्यवरांनी प्रशंसा केली. अभय गरगटे यांनी औषध निर्माण क्षेत्रातील महाविद्यालय व केमिस्ट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वय व सुसंवादाचे नाते निर्माण करून ऋणानुबंधाचा एक धागा जपला आहे. त्यांचे केमिस्ट क्षेत्रातील अतुलनीय कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते बुके देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सातारा तालुका केमिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील, गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव आदी उपस्थित होते.
अभय गरगटे यांना माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम उद्योजक विजय ओसवाल, ड्रग इन्स्पेक्टर दरदंले साहेब व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ
अभय गरगटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्रीरंग काटेकर समवेत प्रवीण पाटील, डॉ. योगेश गुरव.

