साताऱ्यात शनिवारी हिंदू संमेलन
सकल हिंदू समाजातर्फे समर्थ सदन येथे आयोजन
सातारा
येथील सकल हिंदू समाजातर्फे हिंदुत्वाचा हुंकार आणि हिंदू एकता यांच्या दृढीकरणासाठी समर्थ सदन सातारा येथे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून विवेक विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक निलेश धायरकर उपस्थित राहणार असून धर्माचार्य समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा किरण प्रभुणे यांचीही व्याख्याने होणार आहेत. या हिंदू संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय होलार समाज साताराचे जिल्हाध्यक्ष दादासो शिवाजी आवटे असणार आहेत.या संमेलनामध्ये धर्मरक्षण,हिंदू संस्कृती संवर्धन आणि सामाजिक एकता यावर आधारित मार्गदर्शन होणार असल्याने सर्व हिंदू बांधवांनी या संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

