केबीपीच्या बीसीए विद्यार्थ्यांची सैन्यात निवड
सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च वर्ये सातारा येथील बीसीए या व्यवसायीक पदवीच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदल भरतीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्यामध्ये मयुर संजय शिंदे बीसीए भाग-१, गणेश पंढरीनाथ गायकवाड बीसीए भाग-३, प्रतिक अशोक इंदलकर बीसीए भाग-३ व अथर्व संतोष इंदलकर बीसीए भाग-३ यांची निवड झाली आहे.
या यशामागे इन्स्टिट्यूटमधील रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विविध उपक्रम राबविलेमुळे हे यश मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशामध्ये डॉ एस बी चव्हाण, डॉ आक्रम मुजावर, डॉ आर डी कुंभार, ग्रंथपाल विनायक नलवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी केले.

