प्रा.डॉ.दीपक ताटपुजे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
विशेष लेख/ श्रीरंग काटेकर
सातारा पॉलिटेक्निक येथे माजी प्राध्यापक ते सातारा एज्युकेशन सोसायटीचे माजी सहसचिव पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे प्रा.ङाँ. दीपक ताटपुजे यांचा शैक्षणिक सामाजिक उद्योजकीय कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात मोठे योगदान राहिला आहे सतत नाविन्याचा ध्यास घेऊन अनेकांचे जीवनमान प्रकाशमय करणारे प्रा.ङाॅ. दीपक ताटपुजे यांनी असंख्य तरुणाईला कौशल्ये विकासाचे शिक्षण व मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे केले आहे अथक परिश्रम जिद्द चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर आज प्रा. डॉ. दीपक ताटपुजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सेमिनार व संशोधन क्षेत्रात चमकत आहेत सातारच्या या भूमिपुत्राने स्वकर्तुत्वावर अशक्य ते शक्य करून दाखविले आहे नवसंशोधन कौशल्य विकास उद्योजकीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित विद्यापीठांनी व उद्योजकांनी घेऊन त्यांना गौरविले आहे त्यांना नुकताच कर्नाटक येथील सेङाम येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना प्राप्त झालेला सन्मान हा प्रत्येक सातारकरांचा बहुमान आहे
ध्येय निश्चितीचा अखंड ध्यास
जीवनात कितीही परिस्थिती बिकट असली तरी जीवनात हार न मानता परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती मनात असेल तर अशक्य ते शक्य करता येते हे प्रा.डॉ. दीपक ताटपुजे यांनी सिद्ध करून दाखविले आहे लहानपणीच वडिलांचे मायेचे छत्र हरवलेले प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांनी सर्व दुःखाचे ओझे पाठीवर टाकून जीवनात ध्येय निश्चितीचा अखंड ध्यास घेऊन वाटचाल सुरू केली काटेरी जीवनाच्या वाटेवरून प्रवास करताना अनेक सुखदुःखाचे प्रसंग उभे राहिले परंतु या दुःखावर व अडचणीच्या परिस्थितीवर धैर्याने सामोरे जात आलेल्या अडचणी त्यांनी दूर केल्या आणि पाहता पाहता त्यांनी आपली कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचूनन सातारच्या भूमीचा नावलौकिक उंचविला.
भारत गौरव पुरस्कार
कमवा आणि शिका या योजनेतून झालेले संस्कार प्रा.डॉ. दीपक ताटपुजे यांच्या जीवनात कामी आले विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवे नवे संशोधनात्मकताची कार्य करणारे प्रा. डॉ.दीपक ताटपुजे यांच्या आजवरच्या कार्याची दखल आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी ही घ्यावी हे विशेष अभिनंदनीय आहे कर्नाटक सेङाम येथे उत्साहवर्धक वातावरणात सन्मान झालेला भारत गौरव पुरस्काराने सातारची मान खऱ्या अर्थाने उंचविली आहे स्वकर्तुत्वाने भरारी घेणाऱ्या प्रा.डॉ.दीपक ताटपुजे यांनी आजवर संशोधन कौशल्य विकास बरोबरच करिअर गाईडन्स मध्येही उल्लेखनीय कार्य केले आहे प्रारंभीच्या काळात साताऱ्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक अचूक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेत करिअर घङेल याचेही अचूक मार्गदर्शन करीत आँटीटयूट टेस्ट (कल चाचणी)केंद्राच्या माध्यमातून हि शैक्षणिक परिवर्तन घडविले आहे तसेच शासकीय व निम शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून विविध उद्योजकीय शिबिरे व प्रशिक्षण घेऊन राष्ट्रहिताला पूरक कार्य त्यांच्या हातून घडत आहे अशा सातारच्या भूमिपुत्राचा कर्नाटक मधील भारत गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने सातारच्या शिरपेचात एक मानाचा तुरा प्रा. डॉ. दीपक ताटपुजेनी रोवला आहे.
सर्वांसाठी आँयङाॅल
विद्यादीप फाउंडेशन सातारच्या माध्यमातून ज्ञानसंस्कृतीचा अखंड वसा घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातारचे नावलौकिक उंचाविणाऱ्या प्रा. डॉ.दीपक ताटपुजे यांनी नुकताच कर्नाटक येथील सेङाम येथे संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्रत्येक सातारकराना अभिमान वाटावा असे कर्तृत्व प्रा. डॉ. दीपक ताटपुजे करीत आहेत अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील कार्य करणार्या कर्नाटक येथील संस्थेकडून झालेला सत्कार प्रा.डॉ.दीपक ताटपुजेच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरक ठरणार आहे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या समावेत प्रा.ङाँ.दीपक ताटपुजे यांचा झालेला गौरव हा प्रत्येक सातारकरासाठी अभिमानास्पद ठरत आहे उद्योजकता व कौशल्य विकास मनुष्यबळाचे ध्येय ठेवून अखंडपणे वाटचाल करणाऱ्या प्रा.डॉ. दीपक ताटपुजे सर्वांसाठी आँयङाॅल ठरत आहेत.
सातारवसियासाठी अभिमानास्पद
प्राध्यापक ते डॉक्टर पर्यंतच्या संघर्षमय जीवन प्रवासात असंख्य अडचणीवर यशस्वीपणे मात करीत एक इतिहास निर्माण केला आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या कार्याची दखल अमेरिकेतील नामवंत विद्यापीठांनी घेऊन त्यांना गौरविले आहे कौशल्ये व संशोधन क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरीबद्दल अमेरिकेतील मँसेच्युसेटस येथील उद्योजकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या बॅबसा कॉलेजच्या सुप्रतिष्ठित बॅबसन रिसर्च फेलशिपसाठी झालेली निवड ही प्रत्येक सातारवसियासाठी अभिमानास्पद आहे प्रा. डॉ. दीपक ताटपुजे हे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कौशल्ये विकासाचे नवे तंत्र देऊन घडवीत आहेत रोजगार स्वरोजगार सक्षम मनुष्य व निर्मितीचा ध्यास घेऊन त्यांनी केलेल्या वाटचालीस मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होत आहे आज देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांना उद्योजकीय कौशल्ये व ते केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ते विद्यार्थ्यांना मिळवून देत आहेत.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा


