संस्कार भारतीतर्फे भारतमाता पूजन


सातारा
संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतमाता पूजन करण्यात झाले.समितीचे उपाध्यक्ष संजय दिक्षित यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.
यावेळी युवा कीर्तनकार व लेखक ध्रुव सचिन पटवर्धन याचा शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देवून विशेष सत्कार करण्यात आला. त्याने स्वराज्य ७५ या केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेवून सातारा येथील अज्ञात क्रांतिकारक ‘वासुदेव आठल्ये – जीवन दर्शन’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. यासाठी दिल्ली येथे त्यांचा सन्मान देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते झाला आहे.म्हणून संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीच्या वतीनेही त्याचा गौरव करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना त्याने आपल्या या लेखनामागील प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली
यावेळी भारतमाता पूजन, गोमाता पूजन करून आगामी भरतमुनी स्मरण दिन, विविध विधांच्या मासिक कार्यक्रमांचे आयोजन, सभासद नोंदणी या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी लोककला प्रमुख म्हणून भानुदास गायकवाड व प्राचीन धरोअर विधा प्रमुख म्हणून आदित्य फडके ह्यांची नियुक्ती करण्यात आली
या कार्यक्रमास प्रांत प्रचार प्रमुख रुपेश कुंभार, प्रांत साहित्य संयोजक मधुसूदन पत्की, समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर, उपाध्यक्ष संजय दिक्षित, सचिव प्रदीप इनामदार, सह सचिव संजीव आरेकर, मंचीय कला संयोजक सौ.नेहा भिडे – घाडगे, नाट्य विधा प्रमुख सौ.रसिका केसकर, दृश्य कला संयोजक शेखर हसबनीस, प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके याच बरोबर सातारा संयोजन समितीमधील सुरेखाताई कुलकर्णी, वर्षा साबडे, श्यामला जोशी, शलाका शेवडे, उमेश ढवळे हे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांना ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत प्रचारप्रमुख रुपेश कुंभार ह्यांनी केले समिती सचिव प्रदीप ईनामदार ह्यानी देशभक्तीपर गीत गायले,तर आभार सहसचिव श्री संजीव आरेकर यांनी मानले

Advertisement

फोटो ओळ
भारतमाता पूजन आणि गोमाता पूजन प्रसंगी संस्कार भरती सातारा जिल्हा समितीचे पदाधिकारी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!