जगणे गोंदून घेतानाचा रविवारी वाचक समर्पण समारंभ


डॉ अदिती काळमेख यांचा नवीन काव्यसंग्रह
सातारा
लोकप्रिय लेखिका डॉ अदिती काळमेख यांच्या जगणे गोंदून घेताना या नव्या काव्यसंग्रहाचा वाचक समर्पण समारंभ रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी होणार आहे
दिडदा.. दिडदा.. हा 11 पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रह आणि समृद्ध पालकत्व हे 8 पुरस्कारप्राप्त आणि 6 महिन्यात द्वितीय आवृत्तीपर्यंत पोहचलेले पालकत्व मार्गदर्शनपर पुस्तक यानंतर डॉ. अदिती काळमेख यांचा जगणे गोंदून घेताना हा द्वितीय काव्यसंग्रह असून जगणे त्याचा वाचक समर्पण समारंभ रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी दैवज्ञ भवन, समर्थ मंदिर चौक, सातारा येथे होणार आहे आहे.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कवी, लेखक, पटकथाकार किरण येले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून साताऱ्यातील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक किशोर बेडकिहाळ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक वाचकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अमित काळमेख यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!