प्रजासत्ताक दिनानिमित्त यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये ध्वजारोहण


परेड, गीत गायन, नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा
यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शिवकृपा सहकारी पतपेढीचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत वंजारी,संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यशोदा पब्लिक स्कूलच्या शालेय मुलांच्याकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये परेड, गीत गायन, नृत्य आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर आधारित विविध रंगमंच प्रदर्शन झाले. याव्यतिरिक्त ध्वजारोहण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित कलाकृतीने सर्वांचीच मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री चंद्रकांत वंजारी यांनी संविधानावर आणि देशाच्या सार्वभौमतेवर विशेष प्रकाश टाकला. “गणराज्य दिन ही आपली एकजूट आणि संविधानावर असलेली निष्ठा दर्शवते,” असे ते म्हणाले
उपस्थितांनी एकवटून संविधान आणि राष्ट्रध्वजाला सन्मान दिला.सर्वत्र आनंद आणि सन्मानाचे वातावरण होते. दरम्यान यशोदा पब्लिक स्कूलच्या ज्या विद्यार्थ्यांनी स्केटिंग, बॉक्सिंग, तबलावादन तसेच चित्रकला स्पर्धेत यश मिळवले अशा विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी यशोदे इन्स्टिट्यूटचे सल्लागार समितीचे सदस्य श्री संजय मोरे, श्री संजय शेलार, श्री कनुभाई भूपतणि, श्री लोणारे आदी मान्यवर आणि यशोदा इन्स्टिट्यूट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!