अयोध्येला १,११,१११ किलोचे लाडू


देवरा हंस बाबा ट्रस्टचा उपक्रम

Advertisement

अयोध्या
२२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे यंदाचा राम जन्मोत्सव खास मानला जात आहे.संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या भगवान रामाचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राम नवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू प्रसादासाठी अयोध्येतील राम मंदिरात पाठवण्यात येणार आहेत. देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने हे लाडू अयोध्येत पाठवण्यात येणार आहेत. या ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना म्हणाले, देवरा हंस बाबा ट्रस्ट १ लाख ११ हजार १११ किलोचा लाडू प्रसाद अयोध्येला पाठवणार आहे. तसंच, लाडूचा प्रसाद प्रत्येक आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. काशी विश्वनाथ मंदिर असो वा तिरुपती बालाजी असो, सर्व मंदिरात लाडू पाठवले जातात. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ट्रस्टने अयोध्येला ४० हजार किलो लाडू वाटले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!