आदर्श कामगार पुरस्कारांचे रविवारी वितरण


गुणवंत कामगार प्रतिष्ठान तर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील श्री गुणवंत कामगार प्रतिष्ठानतर्फे आदर्श कामगार पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दैवज्ञ हॉल, समर्थ मंदिर जवळ सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत कामगार प्रतिष्ठान तर्फे एक मे या कामगार दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील निवडक कामगारांना आदर्श कामगार पुरस्कार देऊन सपत्नीक गौरवले जाते. या कार्यक्रमामध्ये आदर्श कामगारांचा सत्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्ट जिवाजी मोहिते यांची विशेष उपस्थिती असणार असून गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक रघुवीर आपटे, गोपाळ खजुरे, दिलीप चरेगावकर, सल्लागार अशोकराव जाधव, गजानन घाडगे, इकबाल काझी, खजिनदार संजय गिरी, सरचिटणीस दादासाहेब काळे, उपाध्यक्ष अमृत साळुंखे आणि जिल्हा संघटक संजय पवार यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!