किनारे सावल्यांचे पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
ऍड सौ शुभदा कुलकर्णी यांचा ललितलेख संग्रह
Advertisement
सातारा
वडूज येथील ऍड शुभदा कुलकर्णी यांच्या किनारे सावल्यांचे या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा येथे रविवार २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मान्यवरांचे हस्ते होणार आहे.
ऍड शुभदा कुलकर्णी यांचे यापूर्वी पिंपळपान,अवकाळीचा पाऊस हे दोन काव्यसंग्रह तर असोशींची भाषांतरे हा ललित लेख संग्रह अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
२४ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, मुकूंद फडके डॉ राजेंद्र माने यांच्या शुभ हस्ते होणार सातारकर साहित्यप्रेमींनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

