कांचनगंगेच्या कुशीत पुस्तकाचे लोकार्पण


लेखक संदीप श्रोत्री यांचा मान्यवरांकडून गौरव

सातारा
येथील शल्यचिकित्सक आणि साहित्यिक डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या आणि हेडविग मीडिया हाऊसने प्रकाशित केलेल्या कांचनगंगेच्या कुशीत या पुस्तकाचा लोकार्पण समारंभ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि जेष्ठ अभिनेते,गिरीप्रेमी पर्यावरण तज्ञ मिलिंद गुणाजी उपस्थित होते
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि रानवाटा निसर्ग व पर्यावरण संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सर्वच उपस्थितांनी डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या लिखाणाचा गौरव केला

यावेळी व्यासपीठावर रानवाटाचे जयंत देशपांडे, पुरुषोत्तम पाटील, साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस ,साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी , उप वन संरक्षक अमोल सातपुते, गिर्यारोहक आशिष माने उपस्थित होते
यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील यांनी संदीप श्रोत्री यांच्या गिर्यारोहण मोहिमांचा आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या लिखाणाचे कौतुक केले सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम करत असताना राजभवनातून आपल्याला रोजच कांचनगंगेचे दर्शन होत असे.पण या कांचनगंगेच्या कुशीत जाऊन प्रत्यक्ष गिर्यारोहणाचा अनुभव घेण्याचे काम डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्यासारखे लोकच करू शकतात असे ते म्हणाले

मिलिंद गुणाजी यांनी आपल्या भाषणामध्ये संदीप श्रोत्री अष्टपैलू नाही तर दशपैलू आहेत असे सांगितले वैद्यकीय व्यवसाय सांभाळतही ते ज्या प्रकारे इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे ते स्तुत्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले कारकिर्दीच्या आरंभी सातारमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने राहण्याचा योग आला असताना मला गिर्यारोहणाचा आणि भटकंतीचा छंद लागला असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला

Advertisement

आशिष माने यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर संदीप शश्रोत्री डोळसपणे गिर्यारोहण करतात असे सांगितले मी आत्तापर्यंत गिर्यारोहण करताना पाय घेऊन जात होतो पण डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्यामुळे आम्ही डोळे घेऊन सुद्धा गिर्यारोहण करू लागलो अशा शब्दात त्यांनी कौतुक केले

उप वन संरक्षक अमोल सातपुते यांनी कास पठाराचा उल्लेख करून वनखात्यातर्फे कास पठारासाठी एका पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत देशपांडे यांनी केले
रानवाटाचे पुरुषोत्तम पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली शिरीष चिटणीस यांनी आम्ही पुस्तक प्रेमी समूहातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन संदीप श्रोत्री यांच्या अष्टपैलू कार्याचा गौरव केला
विनोद कुलकर्णी यांनीही आपल्या भाषणामध्ये डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या गिर्यारोहण मोहिमांचा आणि त्यानंतर ते सातत्याने करत असलेल्या लिखाणाचा गौरव केला

डॉ संदीप श्रोत्री यांनी यावेळी स्लाईड शो सादर केला भारत नेपाळ आणि तिबेटकडून या मोहिमा कशा प्रकारे केल्या जातात याची सचित्र माहिती त्यांनी या स्लाईड शोच्या माध्यमातून दिली त्यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन ऍड श्रीमंतनी नूलकर यांनी केले
कार्यक्रमाला रानवाटाचे सदस्य ,आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे सदस्य आणि साताऱ्यातील मान्यवर उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!