लोकसाहित्यातील कविता लय घेऊन येते – हनुमंत चांदगुडे
लोकलयीतील कविता लोकसंस्कृतीचा अविष्कार या विषयावर व्याख्यान
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराष्ट्र तर्फे आयोजित व्याख्यानमालेत प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांचे लोकलयीतील कविता लोकसंस्कृतीचा अविष्कार या विषयावर व्याख्यान झाले.त्यावेळी बोलताना ते म्हणाले, लोकसाहित्य हे जात्यावरची ओवी पंचमीची गाणी, वासुदेवाची गाणी लावणी अशा अनेक प्रकारांनी समृद्ध आहे.
या गाण्यांची ओळख असली की कवीची कविता सुद्धा लय घेऊन प्रकट होते.
निसर्ग शेती मातीतून आलेली माझी कविता सुद्धा या सर्वांचा वारसा घेऊन आलेली आहे म्हणून तिच्यामध्ये सुद्धा मूलभूत लय जाणवून येते.यासाठी कवींनी या ते म्हणाले,आपल्या परंपरागत खजिन्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
याच कार्यक्रमात अमितकुमार शेलार यांनी हनुमंत चांदगुडे यांची पाठ्यपुस्तकात असणारी आळाशी ही कविता म्हणून दाखवली.
डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी हनुमंत चांदगुडे यांचे स्वागत केले.
कविता प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले .
श्रीधर साळुंखे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला वैदेही कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र माने, श्याम बडवे ,सुषमा भिडे,संध्या चौगुले, पद्माकर पाठकजी नंदकुमार शेडगे ,अमित कुमार शेलार प्रदीप कांबळे शुभांगी दळवी वगैरे मान्यवर उपस्थित होते.

