करोडपती व्हायचंय ?आज हे कराच


तुम्हीही ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये होऊ शकता सहभागी

Advertisement

मुंबई
अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनमुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच खुलासा केला की, एकही ब्रेक न घेता त्यांनी कौन बनेगा करोडपतीची आठ तास शूटिंग केली.यावेळी सेटची झलक दाखवताना देखील अमिताभ बच्चन हे दिसले. कौन बनेगा करोडपतीचे सीजन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. कौन बनेगा करोडपतीला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना दिसते. कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
कौन बनेगा करोडपतीचे 16 व्या सीजनची नोंदणी 26 एप्रिल 2024 पासून सुरू होतंय. कौन बनेगा करोडपतीने अनेकांचे जीवन बदलले आहे. लोकांना करोडपती बनवले आहे. काही लोक फक्त अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती होस्ट करत असल्याने बघतात. अनेकांना कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचे असते. मात्र, त्याची प्रक्रिया अनेकांना माहिती नाहीये.
आपण दोन प्रकारे नोंदणी करू शकतो. एक पद्धत म्हणजे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर एसएमएसद्वारे पाठवून. दुसरे म्हणजे सोनी लिव्ह अॅपच्या मदतीनेही आपण प्रश्नाचे उत्तर पाठू शकतो. सोनी लिव्ह ॲपवर लॉग इन करून तिथे माहिती ही भरावी लागेल. यानंतर यामध्ये ज्यांची निवड झाली, त्यांना मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर तुम्हाला कौन बनेगा करोडपती नवीन सीजनची नोंदणी सुरु होईल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!