माझा परिवार,जबाबदार मतदार


कोरेगावला प्रतिज्ञा फोटो स्पर्धा

Advertisement

कोरेगाव
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत .याचाच एक भाग म्हणून “माझा परिवार, जबाबदार मतदार” ही स्पर्धा घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती मतदान जनजागृती पथकाचे नोडल ऑफिसर धनंजय चोपडे आणि पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली. परिवारामधील जे मतदार आहेत, ते सर्वजण मतदान करणारच ,अशा पद्धतीने जागृती निर्माण होण्यासाठी ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत परिवारात जे मतदार आहेत, त्यांनी एकत्र मतदानाची छोटीशी प्रतिज्ञा घ्यावी आणि 70 57 68 19 08 या व्हाट्सअप क्रमांकावर परिवाराचा प्रतिज्ञा घेतानाचा फोटो, परिवाराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक कळवावा. यावेळी मतदान जागृतीचे छोटेसे पोस्टर तयार करून किंवा कागदावर लिहून सर्व कुटुंबातील मतदारांनी आपल्या हातात ठेवावे आणि फोटो काढावा. अशा नाविन्यपूर्ण उत्कृष्ट परिवारांना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही.
प्रतिज्ञा थोडक्यात पुढील प्रमाणे घ्यावी.. “आम्ही सर्वजण भारताचे जबाबदार मतदार आहोत. आम्ही देशाच्या लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वजण शंभर टक्के मतदान करणार आहोत .मतदान करणे हा जसा आमचा अधिकार आहे तसे ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे . हे कर्तव्य आम्ही जबाबदारीने पार पाडू. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही सर्वजण न चुकता मतदान करणार आहोत, अशी प्रतिज्ञा घेत आहोत.” अशा प्रकारची प्रतिज्ञा घ्यावी आणि तसा फोटो परिवाराच्या नाव आणि मोबाईल क्रमांकसह ७०५७६८१९०८ या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. 19 नोव्हेंबरपर्यंत आपले फोटो पाठवावेत, असे आवाहन कोरेगाव प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!