नारायण राणेंना उमेदवारी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपने मिळवला
मुंबई
रत्नागिरी – सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून केंद्रीय मंत्री भाजपचे नारायण राणे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे. किरण सामंत यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले असून अखेर नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा आहे. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे
या लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.
नारायण राणे उद्या शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सभांचा धडाका लावला होता.
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला.
