साताऱ्यात मंगळवारी स्वर दीपावली दिवाळी पहाट
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन
सातारा
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्यातर्फे स्वरसाधना सातारा या संस्थेच्या सहकार्याने स्वर दीपावली हा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये मराठी व हिंदी लोकप्रिय गाण्यांची बहारदार मैफल सादर होणार आहे या कार्यक्रमात सौ प्रज्ञा लाटकर, शर्वरी काशीद, जान्हवी शिंदे, अविनाश वैजापूरकर, दीपक कासववेद आणि संतोष वाघ हे कलाकार गाणी सादर करणार असून व्हायोलिनवर केदार गुळवणी, हार्मोनियमवर राजेंद्र आफळे, तबल्यावर शांताराम दयाळ, सिंथेसाजरवर प्रदीप जिरगे आणि ऑक्टोपॅड वर गुरु ढवळे साथ देणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वारुंजीकर करणार असून ध्वनी व्यवस्था सिम्फनी साऊंड सातारा यांच्यातर्फे पाहिली जाणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

