फिल्म सोसायटीज्च्या स्वीकृत सदस्यपदी शिरिष चिटणीस
पुणे
चित्रपटविषयक चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणाऱ्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ वेस्टर्न रीजनच्या स्वीकृत सदस्यपदी ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक शिरिष चिटणीस यांची निवड करण्यात आली.
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ वेस्टर्न रीजनच्या पुण्यात झालेल्या मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली.
शिरिष चिटणीस हे ज्येष्ठ लेखक असून त्यांच्या दिपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून ते विवीध चित्रपटविषयक आणि साहित्यविषयक उपक्रम राबवत असतात.फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ वेस्टर्न रीजन या संस्थेच्या माध्यमातून आता अधिक चांगले उपक्रम राबवता येतील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ वेस्टर्न रीजनच्या याच मिटींगमध्ये कार्यकारीणीचे 12 सदस्य व 7 स्विकृत सदस्यांची देखील निवड 2026-28 या कालावधिसाठी करण्यात आली
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रीजनच्या कार्यकारीणीवर निवड झालेल्या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे :
किरण व्ही. शांताराम (अध्यक्ष), मुंबई, वीरेंद्र चित्राव (उपाध्यक्ष), पुणे, संदिप मांजरेकर (सचिव), मुंबई, दिलीप बापट (कोषाध्यक्ष), कोल्हापूर, जितेंद्र पाटील (विभागीय सचिव), लातूर, डॉ. सुनिल पुणतांबेकर (सदस्य), डोंबिवली, राजभूषण सहस्त्रबुध्दे (सदस्य), सातारा, हेमंत बेळे (सदस्य), नासिक, डॉ. नवनीत तोष्णीवाल (सदस्य), सोलापूर, विनित जोशी (सदस्य), जळगांव, राजेंद्र तालक (सदस्य), मडगांव-गोवा, ऋता धर्माधिकारी (सदस्य), नागपूर
स्विकृत सदस्य :
शिरीष चिटणीस, सातारा सतीश जकातदार, पुणे अमित चव्हाण, मुंबई सचिन चट्टे, पणजी-गोवा मयुर कुलकण, कोल्हापूर सुधीर मुळे, रत्नागिरी
कार्यालयीन सचिव :
प्रणव साळगांवकर, ठाणे
या बैठकीत चित्रपट चळवळ जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. फिल्म सोसायटी चळवळीचा काळ हा आव्हानात्मक आहे,परंतू ओ.टी.टी. प्लॅटफॉर्ममुळे निराश झालेला रसिक आगामी काळात मोठ्या प्रमाणात पुन्हा आपल्या चळवळीकडे येईल यात शंकाच नाही. फिल्म सोसायटी चळवळ जास्तीत जास्त तरूणाभिमुख होईल या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न करावे लागतील. त्या प्रमाणे कार्यक्रमांची रचना करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच कॉलेज फिल्म क्लब हे आपले ध्येय असून त्यासाठी आपण पुढील 2 वर्षात कार्यरत राहण्याचा निश्चय करण्यात आला.

