दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे रविवारी दिवाळी पहाट
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीपावली उत्सवाच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक ८ नोव्हेंब्र रोजी पहाटे ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे/ मराठी संगीत विश्व निर्माण करणाऱ्या काही प्रतिभावान संगीतकारांच्या गाजलेल्या रचनांवर आधारित कार्यक्रम सचिन शेवडे प्रस्तुत करणार आहेत. यावेळी गायक कलाकार प्राजक्ता भिडे, सचिन शेवडे, स्वरांगी शेवडे गाणी सादर करणार असून शांताराम दयाळ , विजय कांबळे हे वादक म्हणून साथ देणार आहेत कार्यक्रमाचे निवेदन एडवोकेट रेश्मा वाळिंबे करणार असून संगीत संयोजन सचिन शेवडे यांचे असेल. ध्वनी व्यवस्था अक्षता शेवडे सांभाळणार आहेत. गेल्या वीस वर्षापासून दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे वर्षीही दरवर्षीप्रमाणे शाहूपुरी चौकामध्ये कार्यक्रम होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, शाखाअधिकारी रवींद्र कळसकर, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब शालगर यांनी केले आहे

