एकपात्री अभिनयाने रंगभूमी दिन साजरा


दीपलक्ष्मी पतसंस्था,मराठी नाट्य परिषदेचा उपक्रम
सातारा
मराठी रंगभूमी दिन दरवर्षी पाच नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो यानिमित्ताने मराठी नाट्य परिषदेची सातारा शाखा आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने दीपलक्ष्मी सभागृहामध्ये रंगभूमी दिन साजरा करण्यात आला यावेळी साताऱ्यातील महिला कलाकारांनी एकपात्री अभिनयाचे सादरीकरण केले आणि काही मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्य्रक्रमाला सुरुवात झाली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले त्यांनी रंगभूमी दिनाचे महत्त्व स्पष्ट करतानाच संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला

Advertisement


यावेळी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजरो हे शिखर सर करणारी सातारची कन्या धैर्या विनोद कुलकर्णी हिचा सत्कार ज्येष्ठ रंगकर्मी पत्रकार राजू मुळे आणि संपादक मुकुंद फडके यांच्या हस्ते करण्यात आला सत्काराला उत्तर देताना धैर्या विनोद कुलकर्णीने या मोहिमेतील आपल्या अनुभवांचे कथन केले आणि आगामी कालावधीमध्येही असेच धाडसी उपक्रम करणार असल्याचे स्पष्ट केले
एकांकिका लेखन स्पर्धेत यश मिळवणारे सातारमधील लेखक डॉक्टर निलेश माने यांचाही यावेळी सत्कार यावेळी करण्यात आला निलेश माने यांच्या अनुपस्थितीत हा सत्कार त्यांच्या मित्राने स्वीकारला
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून यावेळी सातारामधील महिला कलाकार स्नेहा घडवई रविना गोगावले आणि अंकिता दणाणे यांनी स्त्री विषयाला वाहिलेल्या एकपात्री अभिनयाचे सादरीकरण केले
यावेळी बोलताना मुकुंद फडके यांनी मराठी रंगभूमीला असलेल्या 170 वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेताना सातारा शहराने मराठी रंगभूमीला दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला
राजू मुळे यांनी आपल्या भाषणामध्ये रंगभूमी चळवळीचा आढावा घेतला आणि ही चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता आपल्याला घ्यावी लागेल असे स्पष्ट केले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला कलाकारांनी सादर केलेल्या एकपात्री अभिनयाचे परीक्षणही केले आणि कौतुकाची थाप दिली
नाट्य परिषदेच्या सातारा शाखेचे उपाध्यक्ष अशोक काळे यांनी आभार मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!