माझा किल्ला लोकशाहीचा
कोरेगावात मतदान संदेश स्पर्धा
सातारा
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनजागृती पथकाद्वारे खास बाल मित्रांसाठी अनोखी स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. बालके अथवा विद्यार्थी आवडीने दिवाळीसाठी किल्ले करतात. या किल्ल्यावर सजावट करीत असताना मतदानाचा संदेश लिहावा. हे संदेश, पोस्टर, घोषवाक्य ,चित्र अशा कोणत्याही स्वरूपात असू शकेल किंवा देखावाही असू शकेल . “सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी मतदान करा” असा संदेश या किल्ल्याच्या सजावटीतून मिळावा. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही .आपल्या किल्ल्याचा मतदानाच्या संदेशासह फोटो 70 57 68 19 08 या व्हाट्सअप क्रमांकावर 5 नोव्हेंबर पर्यंत पाठवावा.फोटो सोबत स्पर्धकाचे नाव ,संपूर्ण पत्ता, आणि मोबाईल नंबर अवश्य नमूद करावा.विजेत्यांना प्रथम तीन क्रमांकासह भरघोस पारितोषिके दिली जातील. स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते दिली जातील. या स्पर्धेत मोठ्या व्यक्तींना भाग घेण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा भाग घेऊ शकतात. त्यांच्यासाठी वेगळी पारितोषिके दिली जातील. किल्ल्याच्या फोटोसह वयोगट अवश्य लिहावा ,असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार जनजागृती पथकाद्वारे करण्यात आले आहे. समाजातील विविध वयोगटांपर्यंत आणि विविध घटकांपर्यंत लोकशाहीचे राज्यघटनेचे आणि मतदानाचे महत्त्व पोहोचावे हा या स्पर्धे मागील हेतू आहे.

