सक्षम’तर्फे दिवाळी किटचे वाटप


65 दानशूर व्यक्तींमुळे १००० दिव्यांगांना लाभ

सातारा
समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ, अर्थात सक्षम या देशव्यापी संघटनेच्या सातारा शाखेतर्फे सातारा,वाई,कराड,इस्लामपूर,सांगली जिल्ह्यातील सुमारे एक हजार दिव्यांग बंधू, भगिनींना दिवाळी भेट योजनेंतर्गत दिवाळी किट,फराळ ,कपडे या स्वरूपात वाटप करण्यात आले.
समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहभागातून हे वाटप करून या बांधवांची दिवाळी गोड करण्याचा हा उपक्रम यावर्षी राबवण्यात आला. दिवाळी सुरू होण्यापूर्वी हे किट,भेटवस्तू आदीचे वितरण सक्षम परिवारातर्फे करण्यात आले.

Advertisement


कराड, वाई, लोणंद, साखरवाडी,फलटण,अंबवडे, वाठार,क्षेत्र माहुली, महागाव, देगाव,अपशिंगे,नागठाणे, सातारा, इस्लामपूर,सांगली आदी ठिकाणी मिळून सुमारे एक हजार जणांना हे वाटप करण्यात आले. समाजातील 65 दानशूर व्यक्तींनी यात सहभाग नोंदवला.सक्षम परिवारातील दीपक वाळिंबे,सौ.ज्योती वाळिंबे, सौ.अपर्णा बोकील, नरेन शिवदे, साईप्रसाद कुलकर्णी, चंद्रकांत घाडगे,सचिव आनंद मोरे,सरिता हर्षे,अनुराधा जोशी, राजेश चांडक,कराड, सुधाकर भिलारे,रवींद्र मोने,वाई,डॉ.कुंभार,उदय जोशी, सातारा, महेंद्र येरगट्टीवार, लडगे,जोशी,सांगली यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!