रवी परांजपे यांच्या ‘सौन्दर्यसृष्टी’ दालनाचे उदघाटन


छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे कार्यक्रम
सातारा
पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, सातारा येथे आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रख्यात चित्रकार, तत्त्वज्ञ श्री रवी परांजपे यांच्या ‘सौन्दर्यसृष्टी’ या दालनाचे उदघाटन सहाय्यक अभिरक्षक श्री प्रवीण शिंदे आणि श्रीमती स्मिता परांजपे यांच्या हस्ते झाले.
बॉम्बे आर्ट सोसायटीचा मानाचा ‘रुपधर’ जीवनगौरव पुरस्कार रवी परांजपे यांना प्राप्त असून त्यांची स्वतंत्र अशी परांजपे विचारधारा आहे. राज ठाकरे यांचे ते चित्रकलेतील गुरू असून चित्रकलेसोबत त्यांनी भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या काही ठराविक चित्रकृती, रेखाटने या निमित्ताने रसिकांना अनुभवाण्यास मिळणार आहे.

Advertisement


हे प्रदर्शन दि. 20 ऑक्टोबर पर्यंत खुले असणार आहे. या उदघाटनास पत्नी स्मिता परांजपे, संजय लोपीस, मुलगा रोहित परांजपे, सौ. हेमा द्रविड, विनायक छत्रे, रेवती ओक, वृंदा नारायण , उत्तरा नागचौधरी, ऍड अमित द्रविड, सुहास पंडित, आदित्य पंडित, विजय धुमाळ, महारुद्र तिकुंडे, गौरीशंकर आर्ट कॉलेजचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!