सलग 1111 व्या पुस्तकाचा परिचय


आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या वाटचालीचा मोठा टप्पा
सातारा
सातारामधील साहित्यप्रेमींनी एकत्र येऊन व्हाट्सअपग्रुपची स्थापना केली. वाचन संस्कृतीला पुढाकार मिळण्यासाठी दररोज एका पुस्तकाचा परिचय आणि त्यावर चर्चा आणि साहित्यावर चर्चा असा उपक्रम सुरू झाला. या समूहामध्ये पुणे मुंबई येथून लोक सहभागी होऊ लागले. एवढेच काय दुबई वरून सुद्धा एक जण या समूहात आले.आज या समूहाने सलग 1111 व्या पुस्तकाचा परिचय देण्याचा टप्पा पूर्ण केला.११११ व्य पुस्तकाचे परिचयकर्ता होते श्रीराम महादेव नानल, त्यांनी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या वाचन या पुस्तकाचा पुस्तकाचा परिचय देऊन योग साधला
या ग्रुपच्या यशाचे सारे श्रेय डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, सीमा नूलकर, डॉक्टर राजेंद्र माने, वैदेही कुलकर्णी, विशाल देशपांडे, श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, श्रीराम नानल व अन्य सदस्यांकडे जाते.
हा टप्पा गाठल्यावर समूहाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात येऊन आणखी नवीन नवीन उपक्रम करण्याचे ठरविले. दर आठवड्याला शुक्रवारी समूहावर एका गाजलेल्या चित्रपटाचे रसग्रहण करावे असे ठरविण्यात आले असून त्याची जबाबदारी श्रीराम नानल यांच्याकडे देण्यात आली. यामुळे जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा परिचय पुढील पिढीला सुद्धा होईल. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे दुसरे साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये घेण्याचे ठरवण्यात आले आहे. समूहातर्फे जाहीर कार्यक्रमासाठी दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा हॉल संस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपलब्ध करून देत असतात.
अशा उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळत असून लोकांमध्ये अधिक वाचनाची आवड निर्माण झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!