दीपलक्ष्मी सभागृहात सोमवारपासून पुस्तक प्रदर्शन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा आणि पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 12 ऑगस्टपासून भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार पेठेतील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक- अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी ही माहिती दिली.प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके 25 ते 40 टक्के सवलतीत सातारकर ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विविध विषयांवरील पुस्तकांचा या ग्रंथप्रदर्शनात समावेश आहे. पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ, अशी प्रदर्शनाची वेळ असून प्रदर्शन शुक्रवार दि. 23 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे, असे शिरीष चिटणीस यांनी नमूद केले.
१२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्राचार्य यशवंत पाटणे यांचे हस्ते उदघाटन समारंभ होणार आहे