सिंधुदुर्गच्या जंगलात बांधलेल्या अवस्थेत महिला आढळली


पतीनेच कृत्य केल्याचा महिलेचा आरोप
सावंतवाडी
सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले आहे.

ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.या महिलेकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा आहे जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती. शनिवारी जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या शेतकरी आणि गुराख्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळं त्यांनी जाऊन पाहिलं असता, त्यांना ही महिला बांधलेल्या अवस्थेत मिळाली.त्यानंतर या महिलेला सोडवून तिच्यावर सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
सुटका केली तेव्हा महिलेला काहीही बोलता येत नव्हते . या महिलेला पोलिसांनी तिथून सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आज सकाळी तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

Advertisement

फोटो आणि व्हीडिओमध्ये पाहिलं असता, महिलेच्या शरीरावर कुठे फारशा जखमा दिसत नाहीत. मात्र, अनेक दिवसांपासून काहीही खाल्लेलं पिलेलं नसल्यानं त्या प्रचंड अशक्त झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.पण महिलेला नीट बोलता येत नसल्यानं तिनं लिहायला कागद पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडले याबाबत माहिती दिली.तिनं पतीनंच तिच्याबरोबर अशाप्रकारचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला आहे.
या महिलेनं ती जंगलामध्ये अन्न पाण्याविना 40 दिवसांपासून अशा अवस्थेत होती असा दावा कागदावर लिहून केला आहे. मात्र एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होत आहेमाझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं होतं. याच जंगलात तुझा अंत होईल. मी पीडित असून यातून बचावले. पण तो याठिकाणाहून पळून गेला,” असं महिलेनं लिहून सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू असून सखोल चौकशीसाठी पथकं स्थापन केली असल्याचं सांगितलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!