श्याम बेनेगल पुस्तकावर शनिवारी चर्चासत्र


दीपलक्ष्मी पतसंस्था,आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे आयोजन
सातारा
येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह,दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व इतर साहित्य प्रेमींच्या पुढाकाराने डॉक्टर सविता मोहिते नायक यांनी लिहिलेल्या श्याम बेनेगल एक व्यक्ती एक दिग्दर्शक या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 6 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या चर्चासत्राच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक व माजी संमेलन अध्यक्ष भारत सासणे उपस्थित राहणार असून या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार व प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, हिंदी चित्रपटाचे अभ्यासक श्रीराम नानल, प्रख्यात लेखक व पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री प्रख्यात लेखिका सीमंतिनी नूलकर, प्रख्यात लेखक बाळासाहेब लबडे आणि स्वतः लेखिका डॉक्टर सविता नायक मोहिते सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सर्वांनी या चर्चासत्राला उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे डॉक्टर संदीप श्रोत्री, सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!