गुरुचरित्र पारायण सोहळ्याची रविवारी सांगता
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
येथील अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याला दत्त भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यशवंत दत्तमंदिर शनिवार पेठ सातारा येथे सुरु असलेल्या सोहळ्याचा सांगता समारंभ रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी होणार आहे वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प करून पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला होता यावेळी पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्या दत्त भक्तांना श्री गुरु चरित्राची पोथी भेट देण्यात आली श्री गुरुचरित्रात कथन केलेल्या नियमांप्रमाणे हे पारायण केले जात आहे
सोहळा यशस्वी होण्यासाठी अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी,उपाध्यक्ष श्रीराम देव,सचिव भास्कर मेहंदळे,श्रीकांत वेलणकर,महेश कुलकर्णी आणि अभय गोडबोले आणि महासंघाचे इतर सदस्य परिश्रम घेत आहेत पारायण सांगता सोहळ्यास दत्त भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण महासंघाने केले आहे