लोकमान्य मल्टिपर्पज पतसंस्थेमार्फत “गुरुवंदना”


गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
सातारा
लोकमान्य मल्टिपर्पज पतसंस्थे मार्फत साताऱ्यातील निवडक 5 जेष्ठ मान्यवरांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल “गुरू”म्हणून वरिष्ठ शाखा व्यवस्थापक सुनील मोरे ह्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
सत्काराप्रित्यर्थ संस्थेतर्फे संस्थेचे चेअरमन श्री किरण ठाकूर ह्यांच्या स्वाक्षरीने ,”सन्मानपत्र”बुके,व एक दर्जेदार पुस्तक व सातारी कंदी पेढे आदरपूर्वक प्रदान करण्यात आले.

Advertisement

सत्कारमूर्तीमध्ये जेष्ठनाट्य अभिनेते व सातारा संस्कारभारती अध्यक्ष दिलीप चरेगावकर,विजय पवार (योग गुरू)संजय पातूरकर(लेखक,कवी व समीक्षक)ऍड विजय देशमुख(जेष्ठ विधिज्ञ)विजय जाधव(प्राचार्य पंचायत राज शिक्षण)ह्यांचा समावेश होता.
सत्काराला उत्तर देताना दिलीप चरेगावकर म्हणाले,”लोकमान्य मल्टिपर्पज पतसंस्था”ह्या नावातच ,”लोकमान्यता”आहे,संस्थेचे सहकारातून सहकार्य हे व्रत कौतुकास्पद आहे,संस्था जेष्ठाप्रति गुरुवंदना देऊन समाजास एक सकारात्मक संदेश देत आहे,संस्थेचे सर्व कर्मचारी हे आदर्शवत काम करतात,चेअरमन ,किरण ठाकूर हे संस्थेच्या माध्यमातून अनेक आदर्शवत कार्य करतात, हे भूषणावह आहे
ह्याप्रसंगी कवी पातूरकर ह्यांनी प्रसंगोचित काव्य सादर केले,तर योग गुरू पवार ह्यांनी योगाचे महत्व सांगितले,प्राचार्य विजय जाधव ह्यांनी व्यसनमुक्ती ह्या विषयावर प्रबोधन केले,तर ऍड देशमुख ह्यांनी संस्थेच्या कामावर समाधान व्यक्त केले
प्रारंभी सुनील मोरे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले,ते म्हणाले,”गुरुपौर्णिमेनिमित्त आज ह्या दिगग्जाना गुरुवंदना देताना त्यांच्या कार्याचा संस्थेला अभिमान वाटतो हया गुरुजनांचा तरुणांनी आदर्श घेतल्यास अष्टपैलू समाज निर्माण होईल
कार्यक्रमास संस्थेचे कर्मचारी व नागरिक सभासद उपस्थित होते!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!