सोने-चांदी, मोबाईल होणार स्वस्त
अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे काय होणार स्वस्त
नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी सोने -चांदीचे दागिने स्वस्त होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा केली.
याशिवाय अर्थमंत्र्यांनी मोबाइल फोन, मोबाइल चार्जरवरील बीसीडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता मोबाईल फोन नागरिकांना स्वस्त मिळणार आहे.
अर्थमंत्र्यांनी फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक घटक असलेल्या लिथियम-आयन बॅटरीवरील कर दरातही कपात केली होती. या धोरणातील बदलामुळे कंपन्यांना भारतात फोनचे उत्पादन स्वस्त करणे हा आहे.
सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने खरेदीदारांना वाढत्या दरवाढीतून थोडासा दिलासा मिळणार आहे.
तीन कॅन्सर उपचार औषधांना मूळ सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर्करोगाने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताचा मोबाइल उद्योग खूप मोठा झाला आहे, त्यामुळे त्याच्या मूलभूत कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.अर्थमंत्र्यांनी सर्किट बोर्ड असेंब्ली आणि टेलिकॉम उपकरणांवरील शुल्क 10-15 टक्क्यांनी कमी केले आहे.
बजेटमध्ये काय स्वस्त झालं
मासे अन्न
कर्करोग औषध
सोने चांदी
प्लॅटिनम
भ्रमणध्वनी
मोबाइल चार्जर
विद्युत तारा
एक्स-रे मशीन, सोलर सेट, लेदर आणि शूज
तीन कॅन्सर औषधे
यासोबतच सीमा शुल्क 15 टक्के करण्यात आल्याने देशातील दूरसंचार सेवा आणि उपकरणांच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.
