400 किलो सोनं लंपास


करोडो रुपयांच्या दरोड्यात दोन भारतीय वंशाचे चोर
टोरांटो
कॅनडात तब्बल 400 किलो सोन्याची चोरी करण्यात आली होती. या चोरीत दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.
गेल्या वर्षभरापासून कॅनडाचे पोलीस या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करत होते. आता पोलिसांना मोठे यश मिळाले असून आतापर्यंत एकूण सहा जाणांना अटक केले असून यात दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. या चोरीत चोरट्यांनी एकूण 400 किलोंचं सोन चोरून नेलं होतं.
या सोन्याचे मूल्य 20 दशलक्ष कॅनडा डॉलर होते. कॅनडाच्या टोरॅन्टो विमानतळावरून ही चोरी करण्यात आली होती. नेटफिल्सवर असलेल्या मनी हाईस्ट या बेव सिरीरची प्रेरणा घेऊन चोरांनी ही चोरी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.कॅनडात टोरॅन्टो हे सर्वांत मोठे विमानतळ आहे. या विमानतळावर 17 एप्रिल 2023 रोजी ही चोरी करण्यात आली होती. या सोन्याची किंमत तब्बल 20 दशलक्ष कनाडाई डॉलर होती. सोन्यासह दरोडेखोरांनी विदेशी चलनदेखील पळवले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कॅनडा पोलीस दिवसरात्र मेहनत करत होते. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अमेरिकेच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती. साधारण वर्षभर तपास केल्यानंतर आता पोलिसांना या प्रकरणात मोठे यश आले आहे. यात सहापैकी पाच लोकांना कॅनडातून अटक करण्यात आलेलं आहे. उरलेल्या एका व्यक्तीला अमेरिकेतील पेंसिल्वेनिया राज्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कॅनडा पोलिसांनी अटक केलेल्या एकूण सहा आरोपींपैकी दोन आरोपी हे भारतीय वंशाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर कॅनडाचा कर्मचारी असलेला परमाल सिद्धू आणि भारतीय वंशाचा अमित जलोटा अशी या दोघांची नावे आहेत. याच प्रकरणात भारतीय वंशांची सिमरन प्रीत पनेसर या एअर कॅनडाच्या माजी कर्मचाऱ्याचा शोध चालू आहे.
स्वीस बँक रायफिसेन आणि वालकॅम्बी या दोन बँकांकडून 400 किलो सोने आणि विदेशी चलन 17 एप्रिल स्वित्झर्लंडच्या झ्यूरिचपासून कॅनडाच्या टोरॅन्टो येथे नेण्यात आले होते. या सोन्याच्या सुरक्षेची जबाबदारी ब्रिंक या कंपनीवर सोपवण्यात आली होती. हे सोने आणि विदेशी चलन विमानतळाच्या स्टोअरेज डेपोमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सोने ठेवल्यानंतर साधारण तीन तासांनी एका अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे दाखवून या सोन्याची चोरी केली होती. ब्रिंक कंपनीचा खरा कर्मचारी सोने न्यायला आल्यानंतर या दरोड्याची सर्वांना कल्पना आली. ब्रिंक कंपनीच्या दाव्यानुसार एअर कॅनडाच्या कर्मचाऱ्यांनीच बनावट कागदपत्रे दाखवून ही चोरी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!