इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल


स्टँटर्ड डिडक्शन 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत

नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स स्लॅबविषयी घोषणा केली.नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शन 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नव्या करप्रणालीनुसार टॅक्स स्लॅब

3 लाख रुपये- कोणताही कर नाही
3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के
7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के
10 लाख ते 12 लाख- 15 टक्के
12 लाख ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के

Advertisement

एकीकडे, सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा बदलली तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केले आहेत. दुसरीकडे, जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणे अपेक्षित होते, परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत.
जुन्या करप्रणालीनुसार किती कर भरावा लागणार?
देशात सध्या जुनी आणि नवी अशा दोन करप्रणाली आहेत. जुन्या करप्रणालीचा विचार करायचा झाल्यास 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागू आहे. 5 ते 10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाो. तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरसकट 30 टक्के कर भरावा लागतो. जुन्या करप्रणातील 2.50 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर जो कर आकारला जातो ती रक्कम कर परतव्याच्या तरतुदीनुसार परत मिळते. त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार बघायला गेल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. नव्या करप्रणालीनुसार 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5 टक्के कर लागू होतो. नव्या करप्रणातील स्टँटर्ड डिडक्शन वगळता इतर कोणत्याही पद्धतीने आयकरात सूट मिळत नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!