अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं


टी २० वर्ल्ड कपमध्ये धक्कादायक निकाल
सेंट लुसिया
टी २० वर्ल्ड कपच्या सुपर-8 राऊंडमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. त्यामुळे सुपर-8 च्या ग्रुप ए मधील स्पर्धा अधिक रोमांचक बनली आहे.अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग करताना 6 बाद 148 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 149 धावांच लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 127 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे. याआधी सुपर-8 मध्ये भारताने अफगाणिस्तानला आणि ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला पराभूत केलं होतं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच 21 धावांनी जिंकली.
अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झालं. अफगाणिस्तानने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली.T20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला विजय आहे. या विजयासह अफगाणिस्तानने टुर्नामेंटमधील आपल्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी पुढचा टीम इंडिया विरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असेल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!