मंगळवारी गाणी मराठी मनातील कार्यक्रम
सातारा
येथील दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुप यांच्यातर्फे गाणी मराठी मनातील या कार्यक्रमाचा दुसरा भाग मंगळवार दिनांक 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केला जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनंत जोशी, डॉक्टर श्याम बडवे, काका पाटील, मुकुंद फडके ,विजय साबळे शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे असून यावेळी डॉक्टर सुनील पटवर्धन,शिरीष खुटाळे, रामदास जोशी, चंद्रशेखर बोकील, धीरेंद्र राजपुरोहित, राजेंद्र देशमाने, गणेश शिंदे, वनिता कुंभार ,सीमा रजपूत, ममता नरहरी, कविता शिवकुमार, स्मिता शेरकर, दिपाली घाडगे ,कला चंद, स्वाती मोरे हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत
या कार्यक्रमाचे निवेदन दिपाली गीते करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन व अक्षता शेवडे पाहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

